अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. याबाबत पंकज चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत आज रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची झालेली दुरावस्था बाबत पंकज चौधरी यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे निवेदन दिले होते. त्यास अनुसरून मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणास सूचना दिल्या होत्या. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. पंकज चौधरी, अक्षय अग्रवाल यांचा समवेत पाहणी करून रस्त्याची दुरावस्था निदर्शनास आणून दिली. यानुसार डॉ. अंजली चव्हाण यांचा दवाखान्यामागून ते दुर्गा टी डेपो रस्त्याचं दुरूस्तीच्या कामाचा प्रत्यक्ष आज बुधवार दि. २९ रोजी प्रारंभ करण्यात आला. वारंवार मागणीनंतर रस्ता दुरुस्तीच्या कामास प्रारंभ झाल्याने व्यापारी बांधव समाधान व्यक्त करीत आहेत. तसेच पुढच्या टप्प्यात पाच पावली देवी ते विजय फरसाण पर्यंत रस्ता दुरुस्ती करणार असल्याचे महाराष्ट्र जिवन प्राधिकरनाच्या वतीने चौधरी यांना सांगितले आहे.