अमळनेर प्रतिनिधी । शहरातील एसबीआय बँकेत खातेदाराच्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रूपयांची रोकड लांबविल्याची घटना शनीवारी दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, कय्युम अली मोहम्मद अली शाह (वय-४७) रा. इस्लामपूरा, अमळनेर हे बसमहामंडळात नोकरीला आहे. शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीया ते कामाच्या निमित्ताने २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता आले होते. बँकेचा व्यवहार करून त्यांनी २ लाख रूपये पिशवीत ठेवले होते. पासबुकची इंट्री करत असतांना अज्ञात चोरट्यांनी पिशवीत ठेवलेले दोन लाख रूपयांची रोकड लांबविली. हा प्रकार दुपारी १२.३० ते १.१० वाजेच्या दरम्यान घडला. आपल्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी रोकड लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी कय्युमअली शाह यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि विवेक पाडवी करीत आहे.