Home Cities अमळनेर अमळनेरात दोघांवर चाकूहल्ला

अमळनेरात दोघांवर चाकूहल्ला

0
57

अमळनेर प्रतिनिधी । येथील सुभाष चौकात एका अल्पवयीन युवकाने एक दूध विक्रेता आणि एसआरपी जवानावर चाकू हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, एसआरपी पथकातील कर्मचारी मयूर पाटील हे सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सुभाष चौकात आले असता अल्पवयीन आरोपीने मयूर पाटील यांच्यावर हल्ला करून पाठीवर चाकूने वार केला. यानंतर त्याने दूध विक्रेते हेमंत सोनार यांच्यावर देखील चाकू हल्ला केला. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला घरी जाऊन ताब्यात घेतले. दरम्यान, याच अल्पवयीन आरोपीने काही दिवसांपूर्वी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर चाकू हल्ला केला होता. हा मुलगा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर चाकू हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound