अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुका विधी सेवा समिती व अमळनेर वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ व्यायामशाळेत जागतिक महिला दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवार दि. १० मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या जनजागृतीपर कर्यक्रमात सह दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग अमळनेर एस. एस.अग्रवाल यांनी महिलांच कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण यावर खूपच छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं. एस.एन.डी.टी.महिला महाविद्यालयातील सह प्राध्यापिका डॉ. मंजुषा खरोले यांनी महिला शिक्षण व सबलीकरण याचं महत्त्व पटवून दिलं. तहसील कार्यालयातील अव्वल कारकून संगीता धोंगडे यांनी महिलांविषयी शासकीय योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. नयना नवसरीकर यांनी केलं. आभार अॅड. भारती अग्रवाल यांनी मानले. ग्राहक पंचायतच्या अध्यक्ष अॅड. भारती अग्रवाल, सचिव कपिला मुठे, संघटक करुणा सोनार, उपाध्यक्ष स्मिता चंद्रात्रे, कोषाध्यक्ष वनश्री अमृतकर ,सदस्य उमा अग्रवाल, गंगा अग्रवाल विमल मैराळे उपस्थित होत्या. अमळनेर महिला मंचच्या अध्यक्ष अपर्णा मुठे,कांचन शाह, सरोज भांडारकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केले. याप्रसंगी महिला मंचच्या विद्या हजारे, पद्मजा पाटील, शीला पाटील,व अमळनेर मधील महिला उपस्थित होत्या.