अमळनेर प्रतिनिधी । येथील साळी वाड्यातील महिला मृत झाली असून तिच्या पतीलाही कोरोनाची बाधा झाल्याने हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून हा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे.
अमळनेर येथे रविवारी मृत झालेली महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून तिच्या पतीलाही या विषाणूची बाधा झाल्याचे काल रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आले. यामुळे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी तातडीची बैठक घेऊन ही महिला राहत असणारा साळी वाड्याचा परिसर ‘कंटेन्मेंट झोन’ (संसर्ग क्षेत्र) म्हणून जाहीर केला. याप्रसंगी तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी विद्या गायकवाड, डीवायएसपी राजेंद्र ससाणे, बीडीओ संदीप वायाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गोसावी यांची उपस्थिती होती. यानंतर सुमारे एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला. यामुळे आता या भागात बाहेरून कुणीही जाणार नसल्याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
हे देखील वाचा : मृत महिलेसह तिच्या पतीसही कोरोनाची बाधा
संबंधीत मृत महिला ही परिसरातील अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे. सर्वात भितीदायक बाब म्हणजे तिच्या पतीचे किराणा स्टोअर असल्याने त्यांच्या संपर्कातही अनेक ग्राहक आले आहेत. यामुळे त्यांना देखील कोरोनाची बाधा झाली की काय ? याबाबत प्रशासन सतर्क झाले आहे. मृत महिलेवर रविवारी अंत्यसंस्कार करतांना आठ जणांची उपस्थिती होती. या सर्वांचीही आता स्वॅब चाचणी घेण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : जळगावात तीन कोरोना संशयितांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००