अडावद, ता. चोपडा प्रतिनिधी । कोरानाच्या संसर्गामुळे मृत झालेल्या अमळनेर येथील रूग्णाच्या संपर्कात अडावदचे काही जण आल्याचे समोर आले असून यातील दोघांना कोविड रूग्णालयात तर चार जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अमळनेर येथील कोरोनाबाधेमुळे मृत झालेल्या व्यक्तीचा अडावद येथील काही जणांशी संपर्क आल्याची माहिती समोर येताच येथील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. या अनुषंगाने केलेल्या चौकशीत अमळनेरचा मृत व्यक्ती हा गहू कापणीसाठी अडावद येथील सहा जणांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली. यातील दोघांचा त्याच्याशी थेट संपर्क आला होता. तर उर्वरित चार जण देखील त्याच्या संपर्कात आले होते. यातील दोघांना जिल्हा शासकीय कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांना होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, यासोबत अडावद गावात आज म्हणजे सोमवारपासून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला सरपंच भावना माळी, सपोनि योगेश तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णूप्रसाद दायमा यांच्यासह गावातील मान्यवरांची उपस्थिती होती.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००