शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करा-फडणविसांची मागणी

मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारने शेती माल खरेदी केंद्र सुरू करून शेतकर्‍यांना अडचणीत मदत करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात नमूद केले आहे की, लॉकडाऊन हे करोनावर मात करण्याचे प्रभावी आणि एकमेव अस्त्र असले, तरी हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणेही आवश्यक आहे. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकर्‍यांच्या समस्या त्वरेने सोडविल्यास याला फार मोठा हातभार लागेल. खरीप हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे. आता मशागतीच्या कामांना सुद्धा प्रारंभ होत आहे. बी-बियाणे, खते इत्यादींसाठी शेतकर्यांच्या हाती पैसा असणे जरूरी आहे. पैसा यायचा असेल तर शेतमालाची खरेदी सुरू होणे आवश्यक आहे. कापूस, तूर, चणा इत्यादींची खरेदी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आली असल्याने शेतकर्‍यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत आहे. चण्याची खरेदी तर सुरूच झाली नसल्यानं माल पूर्णपणे शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे लगेचच खरेदीची यंत्रणा सक्षम करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. शेतमाल खरेदी झाली तरच शेतकर्‍यांच्या हाती पैसा येईल आणि त्यांना पुढच्या हंगामाच्या कामाला लागता येईल. त्यामुळे सर्वच ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावीत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content