जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रूग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रूग्णाचा मृत्यू झाला असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या मृत्यूचा आकडा १४ वर गेला आहे.
कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधिताचा मंगळवारी मृत्यू झाला असून यामुळे कोरानाने मृत झालेल्यांचा आकडा १४ वर गेला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली असतांना आणखी एक मृत्यू झाल्याने सुरक्षा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, जिल्हा वैद्यकीय कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे सात कोरोना बाधीत रूग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००