जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दिल्ली येथे श्रद्धा वालकर हिची निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परीषद जळगाव महानगरच्यां वतीनेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी आफताबला फाशीची देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
श्रद्धा वालकर केसने अवघा देश हादरलाय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून क्रूरपणे हत्या केली. या क्रूर घटनेचा निषेध म्हणून आज अखिल भारतीय विद्यार्थी परीषद जळगाव महानगरच्यां वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली व लवकरात लवकर या आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा संयोजक मयुर माळी यांनी केली, याप्रसंगी प्रांत एकलव्य सायिजक चेतन नेमाडे, शिवा ठाकूर, भावीन पाटील, कुणाल कोळी, अश्विन पाटील, केशव पाटील, ऋषिकेश रावेरकर, शुभम तायडे, जयेश पाटील, कुंधन कोळी, गणेश बाविस्कर, हरीश बुचा, रिषभ शुक्ला, कल्पेश जयस्वाल, ऋषिकेश पाटील व पीयूष माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.