मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह मान्यवरांच्या उपस्थितीत आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते आज अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळातील अनेक सदस्यांची उपस्थिती होती. तर राज्यभरातून लक्षावधी श्री साधक या सोहळ्याला उपस्थित होते.
याप्रसंगी अमित शाह यांनी आपल्या भाषणातून धर्माधिकारी कुटुंबाच्या कार्याचा गौरव केला. एखाद्या कुटुंबातील तीन पिढ्या समाजसेवा व आध्यात्मीकतेचा वारसा चालवत असल्याचे असे उदाहरण आपण कुठेही पाहिले नसल्याचे ते म्हणाले.