Home राजकीय अपप्रचाराला बळी पडू नका-माधव भंडारी

अपप्रचाराला बळी पडू नका-माधव भंडारी

0
25

वेंगुर्ला। भारतीय नागरिकत्व कायद्याबाबत जनतेने अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी येथे केले आहे.

यावेळी माधव भांडारी म्हणाले, सन १९५० ते २००९ या काळामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांतून त्या देशातील जे हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्‍चन, पारशी हे निर्वासित म्हणून भारतामध्ये आलेले आहेत त्यांना भारताचे नागरिकत्व देणे एवढ्या मर्यादित कारणासाठी ही दुरुस्ती केलेली आहे. त्यामुळे या दुरुस्तीमुळे कोणाच्याही नागरिकत्व बद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण होत नाही. जनतेने एवढे समजून घ्यावे की, यात केलेली दुरुस्ती ही या कायद्यातील पहिली दुरुस्ती नसून यापूर्वी ५ दुरुस्त्या अशाप्रकारे वेगवेगळ्या देशातील नागरिकांसाठी त्या त्या वेळच्या सरकारने केल्या आहेत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीने दुरुस्त्या कराव्या लागल्या तरी त्यावेळी जे कोणी सरकार असेल त्यांना ते करावे लागेल. नागरिकत्व दुरुस्त विधेयकाबाबत राजकीय पक्षांची काही नेतेमंडळी समाजात वेगवेगळ्या अफवा पसरवित आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत असल्याची माहिती भांडारी यांनी दिली.


Protected Content

Play sound