अपघातात तरुणाचा मृत्यू : अज्ञाताविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

 

जळगाव, प्रतिनिधी ।  नशिराबादजवळ दुचाकीने जाणार्‍या तरुणाचा चारचाकीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना १८ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात होती. आज शनिवारी सकाळी या अपघातप्रकरणी दुचाकीला धडक देणार्‍या अज्ञात कारचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मयूर नरहरी खाचणे (वय-१९) हा तरूण हातमजूरी करून उदरनिर्वाह करतो. १८ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मयूर हा दुचाकी(एम.एच.१९.सी.ई. ५९३२) वरुन टॅ्रक्टरसाठी डिझेल घेण्यासाठी नशिराबाद येथे येत होतो. नशिराबादजवळ काही अंतरावर मयूरच्या दुचाकीस जळगावहून नशिराबाद कडे जाणार्‍या एम.एच.१४ ई.३५६६ या क्रमांकाच्या कारचालकाने जोरदार धडक दिली होती. यात मयूर खाचणे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल केले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मयूरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत मयूरच्या पश्चात आई सुरेखा, भाऊ राकेश व वडील नरहरी खाचणे असा परिवार आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी विकास गायसमुद्रे यांच्या खबरीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी आज शनिवारी मयत मयुर खाचणे याचा आते भाऊ नितीन गुणवंत बोंडे वय ३७ रा. बेलव्हाय ता. भुसावळ याच्या फिर्यादीवरुन मयूरच्या मृत्यूस कारणीभूत एम.एच.१४ ई.३५६६ या क्रमांकाच्या कारचालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण हे करीत आहेत.

 

Protected Content