अपघातात जखमी झालेल्या बसचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आयटीआय समोर जळगाव बस आगाराचे चालक अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. आज पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चंद्रकांत मधूकर पाटील (वय-५७) रा. दादावाडी असे मयत बसचालकाचे नाव आहे. जळगाव बसआगारात ते चालक म्हणून काम करत होते. ९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता कामारून दुचाकीने दादावाडी येथे घरी जात होते. शहरातील आयटीआय समोर अज्ञान वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागून गंभीररित्या जखमी झाले होते. शहरातील खासगी रूग्णालयात आज शुक्रवार १८ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उपचार घेत असतांना प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content