यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील विरावली गावातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर गतीरोधक बसविण्यात यावे या मागणीसाठी ॲड. देवकांत पाटील यांनी यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसापूर्वी यावलपासून विरावली गावात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्त्याचे काम झाले. त्यात विरवली गावाच्या सुरुवातीपासून बसस्थानक विरावलीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. परंतु या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून रस्ता चांगला असल्याने वाहनांचा वेग हा जास्त असतो. यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला गुरे ढोर, घरे, ग्रामपंचायत, सोसायटी, बसस्थानक, अंगणवाडी, शाळा, दुकाने या रस्त्याला लागून असल्याने लहान मुले रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी व्हाव यासाठी विरावली गावाच्या सुरुवातीला तसेच शाळेजवळ, बसस्थानकजवळ, ग्रामपंचायत पातळीवर किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने या विषयात त्वरित लक्ष देऊन गतिरोधक बसवून भविष्यातील संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे या निवेदनाचा विचार करून रस्त्यावर लवकरात लवकर गतिरोधक बसविण्यात यावे असे मागणी केली आहे.