जळगाव राहूल शिरसाळे । जिल्हा परिषदेच्या समोर अनुकंपा धारक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी आज २१ जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार सरळ सेवा भरतीत २० टक्के जागा अनुकंपा साठी आरक्षित असतांना भरती होत नसल्याने अनुकंप धारकांनी न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेत गेल्या ९ ते १० वर्षांपासून अनुकंपाच्या भरत्या झालेल्या नसल्यामुळे आज अनुकंपधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेत विविध संवर्गाची अनेक पदे रिक्त असतांना अनुकंपा नियुक्ती दिली जात नाही. त्यामुळे अनुकंपा प्रतिक्षा यादी आहे तशी आहे. उलट दिवसेंदिवस वाढत आहे. यासंदर्भात अनेक वेळा संबंधित विभागाला भेट घेवून निवेदने देण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ३० जुलै २०२० वित्त विभागाच्या शासनाच्या निर्णयान्वये अनुकंपा पदभरतीवर कोणतेही निर्बंध नाही असे सांगितले आहे. तसचे ५ ऑगस्ट २०२० ग्राम विकास विभागाच्या पत्रानुसार सरळ सेवेच्या विविध संवर्गातील रिक्त पदांना अनुसरून २० टक्के पदभरती करण्यास शासनाचे स्पष्ट सांगितले आहे. तरी जिल्हा परिषदेने २५ ऑगस्ट २०२० रोजी १० टक्के पदांची कार्यवाही अजूनही केलेली नाही. अनुकंपाधारकांना अद्यापपर्यंत कोणताही न्याय न मिळाल्यामुळे आज अनुकंपा धारक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे. उपोषणाची दखन घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
यावेळी किरण साळुंखे, सचिन हिवरकर, सुप्रिया सपकाळे, साजीद तडवी, अजय सोनवणे, योगेंद्र विसपूते, असलम तडवी, मुबारक तडवी, मुकेश चौधरी, मयुर पाटील, राजेश तडवी, प्रदीप महाजन, उमेश मराठे, चंद्रकांत हतागडे, प्रशांत जाधव, विशाल जाधव, अजय महाजन, रोहित श्रीखंडे, नितीन खैरनार, विशाल देवराज यासह आदी अनुकंपाधारक उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/198681088612846