अनिल देशमुखांना सीबीआयने ‘क्लिन चीट’ दिल्याची अफवाच !

मुंबई प्रतिनिधी | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने ‘क्लिन चीट’ दिल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला असतांनाच आता सीबीआयने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

 

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर  फिरत आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती यात देण्यात आली आहे. दरम्यान, या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता मोठी माहिती समोर आली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुखांना कोणतीही क्लिन चीट देण्यात आलेली नाही. अद्याप याप्रकरणी चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे अनिल देशमुखांवर पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या या स्पष्टीकरणानंतर अनिल देशमुखांना क्लीनचीट मिळाल्याच्या बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content