चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील अनवर्दे येथील विवाहितेला दुचाकीसाठी माहेरहून १ लाख रूपयांसाठी सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ करीत सासऱ्याने विनयभंग केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात पती, सासऱ्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अनवर्दे गावातील २० वर्षीय विवाहितेला माहेरहुन नवीन दुचाकी घेण्यासाठी १ लाख रूपये आणावे यासाठी पती रामकृष्ण कैलास शिरसाठ याने शिवीगाळ व मारहाण केली. तसेच लग्नात तुझ्या आईवडीलांनी कोणताही मानपान केला नाही. जर तू माहेरहून नवीन दुचाकी घेण्यासाठी पैसे आणले नाही तर तुला वागवणार नाही अशी धमकी देत वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. २७ मार्च २०२० रोजी पासून पुढील दोन महिन्यांपर्यंत हा अत्याचार सुरू होता. तसेच सासरे कैलास श्रीराम शिरसाठ हे विवाहितेकडे वाईट नजरेने पाहत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा अत्याचार सहन न झाल्याने विवाहितेने चोपडा ग्रामीण पोलीसात धाव घेवून हकीकत सांगितली. विवाहितेच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात पती रामकृष्ण शिरसाठ, सासरे कैलास शिरसाठ, सासु सुनिता शिरसाठ, दिर शुभम शिरसाठ आणि ननंद निकिता शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिवाजी बाविस्कर करीत आहे.