डोळे दान करून कुटुंबाने ठेवल्या बाळाच्या स्मृती जिवंत !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाल कंम्पाऊंडचे वजनदार गेट अचानक तुटून १० वर्षाच्या अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाला होता. परंतू दुदैवाने उपचारादरम्यान प्राणज्योत मालविली. एवढ्या दु:खात असतांना देखील भारंबे परिवाराने बालकाच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी मुलाचे डोळे दान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

 

अधिक माहिती अशी की,  वाल कंमाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक सदरील गेट तुटुन ओम प्रमोद भारंबे (वय-१०) या बालकाच्या अंगावर पडून बालक गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सुमारास मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालय शेजारी घडली होती. डॉ जगदीश पाटील यांचेकडे प्राथमिक उपचार करून जखमी बालकाला पुढील उपचारार्थ जळगाव हलविण्यात आलेले होते. गंभीर जखमी बालक ओम प्रमोद भारंबे ची मृत्यू शी झुंज सुरू होती डॉक्टर ही त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते. परंतु ओमची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर बुधवार २९ मार्च बुधवार रोजी दुपारी ३.५६ मिनिटांनी थांबली व त्याने अखेरचा श्वास घेतला.

 

दरम्यान प्रचंड आघातातही बालकाच्या प्रमोद हरी भारंबे (वडिल) यांनी  बालकांचे डोळे दान देण्याचा निर्णय घेवून बालकाच्या स्मृती जिवंत ठेवल्या असून संकटात ही अवयव दानाची समय सूचकता ठेवून भारंबे कुटुंबीयांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवलेला आहे.

Protected Content