जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आगामी अधिसभा निवडणुकीत बोगस नोंदणी केली जात असून ती रद्द करण्यात यावी अशी मागणी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी कुलगुरू डॉ. विजय महेश्वरी यांची भेट केली आहे.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आगामी अधिसभा निवडणुकीत विद्यापीठातील काही व्यक्ती आपल्या अधिकारांचा गौरवापर करत आहेत. ते कुलगुरू यांच्यावरती दबाव आणत कुठलेही शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता न करता केवळ सदस्य फॉर्म भरून बोगस १६ हजार मागील सदस्य नोंदणी पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तब्बल बोगस सोळा हजार सदस्य नोंदणी या संदर्भातील योग्य त्या कागदपत्रांची कुलगुरू यांनी स्वतः बारकाईने पाहणी करावी तसेच आम्हा विद्यार्थी संघटनांच्या समोर देखील या सर्व बोगस सदस्य नोंदणीच्या संदर्भातील आवश्यक ती कागदपत्र बघण्याकरिता सादर करावीत अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी महा विकास आघाडी संघटनेच्यावतीने युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, सिनेट सदस्य विष्णू भंगाळे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. कुणाल पवार, गौरव वाणी, गणेश निंबाळकर आदी पदाधिकारी यांनी निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, विद्यापीठाच्या “नॅक मूल्यांकन समित” सदस्यांना जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे बोगस सदस्य नोंदणी संदर्भात देणार होते निवेदन. परंतु सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी त्यांची समजूत घालत नॅक मूल्यांकन समितीच्या एक दिवस आधी कुलगुरू सोबत चर्चा करून त्यावर योग्य तो मार्ग असे आश्वासित करून आज कुलगुरू यांच्या सोबत सकारात्मक चर्चा पूर्ण झाली. यावेळी कुलगुरू डॉ. महेश्वरी यांनी नॅक मूल्यांकन समिती नंतर म्हणजेच २५ ऑगस्ट नंतर ते स्वतः या संपूर्ण प्रकरणांमध्ये बारकाईने लक्ष ठेवून बोगस सदस्य नोंदणी तात्काळ रद्द करून पारदर्शक पद्धतीने संपूर्ण अधिसभा निवडणूक पार पडेल असे आश्वासन महा विकास आघाडी संघटना समोर दिले.