अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून वाहन हस्तांतराची किमया !

 

जळगाव : प्रतिनिधी । शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागात खोट्या स्वाक्षऱ्या कागदपत्रे तयार केल्यानंतर  वाहन हस्तांतरित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला  आहे  रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामुळे आरटीओ विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

कलीम कमरुद्दीन शेख ( रा. अंतुर्ली ता. मुक्ताईनगर ) यांच्याकडे एमएच १८ डब्ल्यू ४४३०)  क्रमांकाचे चारचाकी तवेरा वाहन आहे. २ फेब्रुवारीरोजी शेख फारूख उर्फ गुड्डू ( रा. तांबापुरा, जळगाव ) याने या वाहनाच्या मालकी हस्तांतरणाबाबत अर्ज केला होता. अर्जासोबत मूळ वाहनाचे स्मार्ट कार्ड आरसी बुक, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती  व  कलीम शेख या नावाचे आधार कार्ड झेरॉक्ससह वाहन विकत घेणारा आरिफ शेख हसन ( रा. अंतुर्ली ता. मुक्ताईनगर ) यांचे आधार व पॅन कार्डची झेरॉक्स जोडून वाहन विक्रीचा दस्तऐवज तयार केला होता.

 

या कागदपत्राच्या आधारे वाहन मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून  ते वाहन कलीम शेख यांच्या नावावरून आसिफ शेख याला हस्तांतरित करण्यात आले. स्मार्ट कार्ड आर.सी. बुक तयार करण्यात आले.

 

दरम्यान कलीम कमृद्दिन शेख यांनी ९ फेब्रुवारीरोजी माहितीच्या अधिकारानुसार  अर्ज केला की ते  वाहन बेकायदेशीर इतर व्यक्तींच्या नावे हस्तांतरण करण्यात आले आहे चौकशी केली असता वाहन हस्तांतराचा वेळी जोडण्यात आलेल्या कागदपत्रात  वाहनाचे मूळ नोंदणी प्रमाणपत्र व हस्तांतर प्रमाणपत्रात असलेला क्रमांक चेसिस क्रमांकाशी जुळत आहे.  ऑनलाईन  पद्धतीने आरिफ शेख यांना वाहन विकल्याची कागदपत्रे देण्यात आली आहे.

 

मूळ कागदपत्रांसह कलीम शेख  काही कागदपत्रे  वरिष्ठ लिपिक यांना तपासणीसाठी दिली. यात अर्जात कनिष्ठ लिपिक पी. एन. खरात, वरिष्ठ लिपिक एल.ए.महिरे, प्रभारी कनिष्ठ लेखा परीक्षक जे.बी. कुलकर्णी  व  प्रभारी सहाय्यक प्रादेशिक अधिकारी महेश देशमुख यांच्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या बनावट केल्या असल्याचे निष्पन्न झाले.प्रभारी लेखापरिक्षक अधिकारी जवाहर कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून कलीम शेख, शेख फारूख उर्फ गुड्डू आणि ऑनलाइन फॉर्म भरणार अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content