मुंबई (वृत्तसंस्था) “हायवे लुटारु ‘अदानी’कडून आलेले हे माझे वीज बिल. ज्याला आमचे बिल बघून चांगलेच हसू येत आहे, अशा शब्दात अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी याने चक्क लाखभर रुपयाचे वीज बिल आल्यानंतर चांगलीच आगपाखड केली आहे.
अर्शद वारसी आपल्या ट्विटरमध्ये “हायवे लुटारु ‘अदानी’कडून आलेले हे माझे वीज बिल. ज्याला आमचे बिल बघून चांगलेच हसू येत आहे. 1,03,564.00 रुपये तुमच्या खात्यातून 5 जुलै 2020 रोजी डेबिट केले” असे ट्वीट अर्शदने केले आहे. त्यासोबत अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा खळाळून हसतानाचा फोटो अर्शदने शेअर केला आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी अभिनेत्री तापसी पन्नू हिनेही वाढीव वीज बिलाची तक्रार ट्विटरवर केली होती. दुसरीकडे वाढीव बिलाबाबत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येत आहेत.
This is my electricity bill from the highway robbers called ADANI, who is having a good laugh at our cost. UPDATE: INR 1,03,564.00 debited from A/c on 05-JUL-20… pic.twitter.com/VBddvjlpPy
— Arshad Warsi (@ArshadWarsi) July 5, 2020