पाचोरा, प्रतिनिधी ।केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर लादलेले निर्बंध उठवावे या मागणीसाठी दिल्ली येथे गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. एक दिवस शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणुन आज दि. ७ रोजी शहरातील शिवसेना कार्यालयात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
पत्रकार परिषदेत महाआघाडीच्या मित्र पक्षांनी दि. ८ डिसेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता एकदिवसीय कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. यावेळी आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, गणेश पाटील, पप्पु राजपुत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, अॅड. अमजद पठाण, नंदकुमार सोनार, विकास वाघ, इरफान मणियार, नगरसेवक विकास पाटील, अजहर खान, रणजीत पाटील, सतिष चौधरी, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष हरिभाऊ पाटील, सुनिल शिंदे सह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.