जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत. यानुसार आज मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी व्यापारी संकुले व बाजार पेठेत जाऊन अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापन ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन केले.
३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजार पेठ बंद ठेवण्यात येणार असल्याने खरेदीसाठी गर्दी वाढू नये यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना तत्काळ बंद ठेवण्यासाठी दुपारी ४ वाजता उपायुक्त संतोष वाहुळे यांनी आवाहन केले. यात त्यांनी फुले मार्केट, बाजार पेठ, गोलाणी मार्केट, टावर, केळकर मार्केट, अशोक टाॅकीज आदी परिसरात बंद ठेवण्याबाबत आवाहन केले. त्यांच्या आवाहनानंतर दुकानदारांनी आप आपली दुकाने बंद केलीत. अत्यावश्यक सेवेतील दुध, फळ, मेडिकल आदी सुरु राहतील तरी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानदारांनी दुकाने ठेऊन जिल्हा व मनपा प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन उपायुक्त संतोष वाहूळे यांनी केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/281967853372675