अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या : पोलीस अधीक्षकांकडे मागणी (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेतील अल्पवयीन आरोपीस बालसुधारगृहात पाठविण्यात यावे, हा खटला सरकारी वकील उज्वल निकम यानी चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षकांना राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बी.एम.ए. आदी संघटनाद्वारे देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. या घटनेने पिडीतेच्या कुटुंबावर खूप मोठा मानसिक, सामाजिक आघात झाल्याने या कुटुंबाला शासकीय मदत जाहीर करावी. पीडित कुटुंब निरक्षर असल्याने कुटुंबीयांच्या स्वाक्षऱ्या होण्याआधी त्यांना ते वाचून दाखवून त्यांची सहमती घेण्यात यावी. त्यांच्यावर कोणताच दबाव समाजकंटकांमार्फत, गुन्हेगारांच्या नातलगांमार्फ अथवा तपास अधिकाऱ्यांच्या मार्फत होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. पिडीत मुलीस न्याय न मिळाल्यास संघटना व समाज राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संयोजक गणेश काकडे, जिल्हाध्यक्ष डी. ए. सोनवणे, बामसेफ राज्य कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे, संजय वानखेडे, कमलाकर सावकारे, संदीप ठोसर, व्ही. डी. सावकारे, निवृत्ती सूर्यवंशी, अविनाश वानखेडे, किशोर सोनवणे, प्रकाश बाविस्कर, बाबूलाल तायडे, कैलास वाघ, राजू सोनवणे, बी. एम. पी. जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/335544308624455

 

Protected Content