अहमदनगर (वृत्तसंस्था) अहमदनगर-दौंड महामार्गावरील शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. सचिन दत्तात्रय बारगुजे व अशोक नानासाहेब पवार अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
सचिन दत्तात्रय बारगुजे व अशोक नानासाहेब पवार हे दोघे नगर येथे कांदा विक्री करून अहमदनगर-दौंड रस्त्याने घोटवी गावच्या दिशेने निघाले होते. साधारण नऊ वाजेच्या सुमारास दुचाकी चिखली घाटात आली असता समोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले.