मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादीतर्फे करण्यात आलेले प्रयत्न फसल्याची माहिती आता समोर आली आहे.
अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे गेले होते. त्यांनी सुमारे एक तासभर चर्चा केली तरी अजित पवार यांनी त्यांना साफ नकार दिला. यानंतर सुप्रीया सुळे यांनीदेखील अजित पवार यांच्यासोबत मोबाईलवरून चर्चा केली. मात्र यातूनही काही तोडगा निघाला नाही. यामुळे अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न फसले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अकरापैकी सात आमदार राष्ट्रवादीकडे परतले असल्याचेही दिसून आले आहे.