भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपचे प्रदेश सचिव अजय एकनाथ भोळे यांच्याकडे पक्षाने आता नंदुरबार जिल्ह्यासह मालेगावच्या प्रभारीपदाची जबाबदारी देखील टाकली आहे.

भुसावळ येथील माजी नगरसेवक तथा पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय एकनाथ भोळे यांना अलीकडेच प्रदेश कार्यकारिणीत सचिवपदी स्थान मिळाले होते. या माध्यमातून त्यांना मोठे पद प्रदान करण्यात आले होते. आता याच्या पाठोपाठ त्यांच्यावर नंदुरबार जिल्ह्यासहा मालेगाव येथील पक्षाचा प्रभारी करण्यात आलेले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील पत्र जारी केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केलेल्या पत्रात त्यांच्यावरील नवीन जबाबदारीची माहिती देण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल अजय भोळे यांचे राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण तथा क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.