अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अ.गो. द.महासंघ,गोवा राज्य या संस्थेतर्फे आयोजित (दोन राज्य स्पर्धा) Two state competition राज्यस्तरीय मराठी काव्य लेखन स्पर्धेत उपक्रमशील शिक्षक तथा पत्रकार अजय भामरे यांनी सामाजिक विषयावर काव्यलेखन केले होते. या स्पर्धेत त्यांच्या कवितेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
येत्या १९ डिसेंबर २०२२ रोजी गोवा मुक्तीदिनी, पणजी येथे बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.