अखेर साकळी केंद्राला मिळाले कायमस्वरुपी केन्द्रप्रमुख   

a6b8917d adf7 4fe8 9d93 3d092fa330bc

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी जिल्हा परीषदच्या केंद्राला मागील १० वर्षांपासुन कायमस्वरुपी केंद्रप्रमुख नसल्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळांचा सर्व कारभार हा वाऱ्यावर चालत होता. आता केंदप्रमुखांची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांचे अनेक शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा पालकवर्गात व्यक्त करण्यात येत आहे.

 

या परिसरात शाळांमधील शिक्षकच केद्रप्रमुख पदाचा पदभार सांभाळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. अखेर साकळी केंद्राला कायमस्वरुपी केन्द्रप्रमुख मिळाले आहेत.

तालुक्यातील दहीगाव येथे कार्यरत असलेले विजय रंगनाथ ठाकुर यांची साकळी केंद्रात अतिरिक्त केन्द प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एजाज शेख यांनी दिली आहे. साकळी परीसरातील अनेक शाळा वेळेवर भरत नसुन शिक्षक अनियमीतपणे ये-जा करतात तर काही शिक्षक तहसिलदार कार्यालय प.स. कार्यालयात भंटकती करत असतात. अशा तक्रारी पालकवर्गातुन होत असुन नव्याने रुजु झालेले केंद्रप्रमुखांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Protected Content