अखेर शाहीन बागचा रस्ता खुला

shaheen bagh to pm modi

नवी दिल्ली । तब्बल दोन महिन्यानंतर शाहीनबाग येथील एक रस्ता खुला करण्यात आल्याने फरीदाबाद आणि जैतपूर कडे जाणार्‍या प्रवाशांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

दिल्लीतील शाहीनबाग परिसरात केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून १३ डिसेंबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासून आतापर्यंत आंदोलकांनी या भागात ठिय्या मारला होता. यामुळे नोएडा आणि फरीदाबादला जोडणारा हा रस्ता बंद होता. त्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. फरीदाबाद जाण्यासाठी प्रवाशांना डीएनडीच्या रस्त्यानं काही किलोमीटरचा प्रवास वाढवत फिरून – फिरून फरीदाबादला पोहचावं लागत होते. मात्र आंदोलकांशी झालेल्या चर्चेतून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्ते मोकळे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला आंदोलकांनी प्रतिसाद दिल्याने आज पोलिसांनी ओखला पक्षी विहारजवळ केलेलं बॅरिकेडींग हटविले आहे. यामुळे फरीदाबाद आणि जैतपूरकडे जाणार्‍या नागरिकांचा फेरा वाचणार आहे. तथापि, अजूनही आंदोलन सुरूच असल्यामुळे परंतु, कालिंदीकुंजला जोडणारा रस्ता मात्र अद्याप बंद आहे.

Protected Content