यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली वड्री धरणात पोहण्यास गेलेल्या एका तरूणाचा पाण्यात बुडाल्याची घटना काल घडली होती. घटनेच्या २४ तासानंतर अखेर त्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
या संदर्भात माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील राहणारा फिरोज वसीम खाटीक (वय-२०) हा तरूण रविवार २६ जुलै भाऊ आणि मित्रांसोबत वड्री येथील धरणात पोहण्यास गेला असता सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास धरणात पोहण्याकरीता पाण्यात उडी मारली असता तो बुडाला होता. काल देखील काही स्थानिक पोहणाऱ्याच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न झाला पण तो मिळुन आला नव्हता. अखेर घटनेच्या २४ तासानंतर फिरोज वसीम खाटीक या तरूणाचा मृतदेह काढण्यात यश आले आहे. मयत फिरोज खाटीक याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असुन, या घटनेची खबर हाजी शेख हकीम शेख अल्लाउद्दीन यांनी दिल्यावरून यावल पोलिसात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी असलम खान हे करीत आहे.