पहूर, ता.जामनेर रविंद्र लाठे । पहूर येथील आर. टी.लेले. हायस्कूल व महावीर पब्लीक स्कूल या कोविड केअर सेंटरमध्ये अव्यवस्था असल्याचे वृत्त लाईव्ह ट्रेंडस न्यूजने प्रकाशित केले होते. यानंतर प्रांताधिकार्यांनी केलेल्या पाहणीतही हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या सेंटर्समध्ये सॅनिटायझेशनसह साफसफाई करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, मंगळवारी प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांनी येथील आर. टी. लेले. हायस्कूल व महावीर पब्लीक स्कूल या कोविड केअर सेंटरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी अनेक सुचना दिल्या. त्यात महावीर पब्लिक स्कूल येथील कोवीड सेंटर मध्ये नाचणखेडा येथील बारा जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असले तरी या कोविड सेंटरमध्ये कुठेही सोशल डिस्ट्रिंगशन चे पालन होतांना दिसत नव्हते. विलगीकरण केलेले अनेक जण एकाच ठिकाणी आढळून आले. तसेच कोवीड सेंटरला दररोज सॅनिटायझेशन होणे गरजेचे असल्याचे सांगून एक परिचारिका आवश्यक आहे. कोवीड सेंटर मध्ये स्वच्छतेचा अभाव जाणविला होता. तर समोर लाईट ची व्यवस्था करण्याचे सांगितले होते. या कोविड सेंटरमधील असुवीधांमुळे प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकार्यांना फटकारल्याने प्रशासनाच्या कार्यपध्दतीवरून प्रश्न निर्माण झाले होते.
दरम्यान, प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने महावीर पब्लिक स्कूल येथील कोवीड सेंटर येथे स्वत: सरपंच पती रामेश्वर पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. पी. टेमकर यांनी स्वत हा उभे राहून ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांकडून कोवीड सेंटरची साफसफाई व फवारणी करून घेतली. याबाबत लाईव्ह ट्रेन्डस न्युज ने वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत पहूर पेठ ग्रामपंचायतीने कोवीड सेंटर ची साफसफाई करून फवारणी केली.