भुसावळ, प्रतिनिधी । सफाई कर्मचारी यांच्या अडीअडचणीवर चर्चा करण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भुसावळ शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे सफाई कर्मचारी असुरक्षित आहेत. त्यांना आपले सुरक्षाकवच मिळावे यासाठी मुख्याधिकारी यांच्याशी न चर्चा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले तसेच सफाई कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. . प्रमुख खानदेश विभाग प्रमुख सुनील खोखरे व जिल्हाध्यक्ष संतोष धामणे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष अनिल ढाक, तालुका उपाध्यक्ष अजय, शहर अध्यक्ष सुनील लोट, शहर उपाध्यक्ष मनोज डुलगज, ऍड. विजय तायडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र वानखेडे ,शहर कार्याध्यक्ष प्रवीण पंडित, शहर उपाध्यक्ष पवन कुमार चांडाले, शहर सचिव प्रदीप भालेराव, शहर सचिव अनुप टाक, कोषाध्यक्ष प्रसाद लोट, कोषाध्यक्ष सागर भंडारे आदी उपस्थितींत होत .