अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अर्ज लॉकडाऊन उघडल्यानंतर जमा करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 110 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा अर्ज लॉकडाऊन उघडल्यानंतर जमा करण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे. तूर्त ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 110 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ही कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्याअनुषंगाने घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण 15 एप्रिल-2020 पर्यंत पुर्ण झाले आहे. अशा सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा फॉर्म भरावा व त्याची प्रिंट व परिक्षा फी, बीटीआरआय विभागात लॉकडाउन उघडल्यानंतर जमा करावी. असे अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सूचना केंद्र, व्दारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content