भारतीय सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

indian army

जळगाव, प्रतिनिधी । कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील तरूण व तरूणींसाठी 8 नोव्हेंबरपासून (सीडीएस) कोर्सचे आयोजन करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी 2 फेब्रुवारी, 2020 रोजी घेण्यात येणा-या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेकरीता 30 ऑक्टोंबर, 2019 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात प्रसिध्द होणार आहे. संघ लोकसेवा आयोगाकडे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 19 नोव्हेंबर, 2019 अशी आहे. ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी www.upsconline.nic.in या वेबसाईटचा वापर करावा. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परिक्षेद्वारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशन साठी निवड करण्यात येते.

कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, ना‍शिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 8 नोव्हेंबर 2019 ते 21 जानेवारी, 2020 या कालावधीत (सीडीएस) कोर्सचे आयोजन करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव येथे दि. 1 नोव्हेंबर, 2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेब साईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन किंवा गुगल प्लस मध्ये PCTC Training असे सर्च करुन त्यामधील CDS-59 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३१ आणि २४५१०३२ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

Protected Content