जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महिला सशक्तिकरण साठी दि.8 ऑक्टोबर शनिवार रोजी काव्यारत्नवली चौकात, घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना एक एक पाऊल पुढे जात हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांची बाजारात ओळख व्हावी,
या करिता हा अखिल भारतीय मारवाड़ी महिला मंडळाचावतीने दिवाळी निमीत्त व पंतप्रधान मोदींजींच्या आवाहनाप्रमाणे वोकल फॉर लोकल तसेच ऑनलाईन खरेदी टाळुन लहान व्यावसायिकांची देखील दिवाळी आनंदात जाओ या उद्देशाने या एक दिवसीय एक्जीबिशनचे आयोजन केले आहे.
यात होम डेकोरेशन, ड्रेस मटेरियल साडी, कार्पेट, दिवे, तोरण, टॉप्स, ज्वेलरी, फराळाचे पदार्थ याचबरोबर गरम गरम नाश्त्याचे भरपूर स्टॉल हे सगळेच एका छता खाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या एक दिवसीय एग्जीबिशनचा सगळ्यांनी फायदा घेऊन महिला सशक्तीकरणासाठी मदत करावी व भेट देऊन दिवाळीची खरेदी करावी असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सुधा खटोड सचिव दिप्ती अग्रवाल प्रचार मंत्री सोनल गांधी ,आणि मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.