अकोला (वृत्तसंस्था) कोरोनाचा संशयित म्हणून अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाने आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्यामुळे घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाला काही दिवसांपूर्वीच कोरोनाग्रस्त म्हणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू करून कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. हा रिपोर्ट आल्याच्या अवघ्या काही तासानंतर हा रुग्ण गळा चिरलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयाच्याच बाथरुममध्ये सापडला. विशेष म्हणजे, हा रुग्ण आसाम येथील रहिवासी आहे. तो या ठिकाणी कसा आला याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास मोहम्मद रक्तबंबाळ अवस्थेत बाथरूममध्ये आढळल्यानंतर तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.