यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे घाटात ट्रक व अवजड वाहनांवर दगडफेक करणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक करण्यात यावल पोलीसांनी यश आले आहे. अजून काही दरोडेखोरांच्या शोध सुरू आहेत. याप्रकरणी यावल पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गेल्या आठवड्यात अंजाळे गावाजवळ असलेल्या अंजाळे घाटात अवजड वाहने व ट्रकांवर मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर यावल पोलीस निरीक्षक अरूण धनवडे हे आरोपींच्या शोध मार्गावर असतांना रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पुन्हा अहमदाबाद ते नागपूर ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी ८८७४) हा गोळ्या व औषधे घेवून जात असतांना रात्री १२.३० वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी ट्रक आडवून दोन हजार रूपये लुटल्याची खबर ट्रक चालक विजय भगवान पाटील रा. डोंगोरगाव ता. शहादा जि. नंदूरबार याने यावल पोलीसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह स.फौ.मुजफ्फर खान, पोलीस कर्मचारी असलम खान, निलेश वाघ, विनोद खांडोबारे, संजय देवरे, गोरख पाटील, पोलीस वाहन चालक इस्माईल तडवी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा शोधार्थ रवाना झाले. रस्त्याच्या आवारात संशयित चार आरोपी अंजाळे शिवारातील जंगलात लपून बसल्याचे मिळून आले. पोलिसांना पाहून सदर आरोपी यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करून अखेर त्या रस्ता लुटीतील चोरट्यांना जेरबंद केले.