मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील अल्पजा शाळेजवळील असलेल्या अंगणवाडीतून चोरट्यांनी घरगुती गॅसचे सिलेंडर चोरून नेल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात अज्ञात चोरट्यांवर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील अल्पजा शाळेजवळ अंगणवाडी क्रमांक-१८ आहे. याठिकाणी अंगणवाडीत लागणारी साहित्य एका खोलीत ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये गॅस सिलेंडर इतर सामान आहे. १७ नोव्हेंबर दुपारी १ ते १८ नोव्हेंबर सकाळी ९ वाजेच्या दरम्यान खोली बंद असताना अज्ञात चोरट्यांनी लाकडी फळी तोडून आत प्रवेश करत गॅस सिलेंडर चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अंगणवाडी मदतनीस यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहम्मद तडवी करीत आहे.