हरीओम नगरातून महापालिका कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील हरीओम नगरातून महापालिका कर्मचाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरण गुरूवार ११ मे रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश बळीराम सपकाळे (वय-५६) रा. हरीओम नगर, आसोदा रोड, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात नोकरीला आहे. ९ मे रोजी रात्री १०.३० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ एयू ७४४२) ही दुचाकी पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही पार्क करून लावलेली दुचाकी चोरून नेली. त्यांनी परिसरातील दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंत दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरूवार ११ मे रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदिप नन्नवरे करीत आहे.

Protected Content