पाचोरा-लाईव्ह ट्रेंडन्स न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियाचा वापर करतांना विवेकाबरोबर स्वनियमन, स्वनियंत्रण आणि स्वअनुशासन त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास आपणास त्यापासून कुठलेही नुकसान होणार नाही. असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी माउंट आबु (राजस्थान) राष्ट्रीय मीडिया संमेलनात केले.
ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभागातर्फे माउंट आबू (राजस्थान) येथे राष्ट्रीय मीडिया संमेलन आयोजित केले. यात देशभरातून प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सायबर माध्यम प्रतिनिधीं उपस्थित होते. डॉ. सोमनाथ वडनेरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी प्लानरी सेशनमध्ये सोशल मीडियाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. सोशल मीडियाचा विवेकी वापर नेहमी हिताचाच असून आवश्यक काळजी घेतल्यास त्यापासून निश्चित फायदा होतो असेही डॉ. सोमनाथ वडनेरे म्हणाले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.