सम्राट कॉलनीतील दगडफेक प्रकरणात संशयित आरोपी पोलीसात ताब्यात

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील वाढदिवसाचा केक कापून एकमेकांना लावत होते. असे असतांना यातीलच काही जणांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीत दोन मालवाहून रिक्षा आणि दोन दुचाकींचे नुकसान झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुरूवार १८ मे रोजी रात्री २ वाजता एमआयउीसी पोलीस ठाण्यात जमावार गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात बुधवारी १७ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जिशांत उफ दिशू युनूस शिकलीकर रा. मासूमवाडी, जळगाव याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे मित्र आलेले होते. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर एकमेकांना लावत होते. यानंतर अंडे मारण्यास सुरूवात केली. असे करत असतांना अचानक जमलेल्या तरूणांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. यात दोन मालवाहू रिक्षा आणि दोन दुचाकींचे नुकसान झाले. या दगडफेकीमुळे सम्राट कॉलनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून धरपकड करण्यास सुरूवात केली. पोलीसांनी केलेल्या कारवाईत जिशांत उर्फ दिशू युनूस शिकलीकर, शकिब फारूख पटेल, उमर उर्फ गोलू जावेद शेख , परवेज उर्फ तिरंग खान युनूस खान, रिुक मूसा पटेल, सैय्यक अकिब सैयद वाहेद, अफसर जाकीर शेख , नईम बंडू शिकलीकर सर्व रा. मासूमवाडी, जळगाव यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस नाईक छगन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी १८ मे रोजी रात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content