व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील २० वर्षीय तरूणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोनवेळा अत्याचार केला. तर तिच्या चुलत भावाला मारहाण करून धमकी दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जून २०२२ मध्ये तरूणी ही घरी एकटी असतांना संशयित आरोपी फारूख सुलतान पठाण हा घरात घसून तरूणीला मारहाण केली, तर आई वडील व भाऊ यांना मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरी अत्याचार केला. याबाबतचे त्याचे व्हिडीओ केला. त्यानंतर २० जून २०२२ रोजी व्हिडीओ  व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर त्याने लग्नासाठी तरूणीने नकार दिल्याने पीडित तरूणीचा भाऊ याला फारूख सुलताण पठाण आणि सुलताण अब्दुल पठाण यांनी मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणानंतर पिडीत तरूणीने बुधवारी २१ जून रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी फारूख सुलताण पठाण याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. पुढील तपास पेालीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहे.

Protected Content