व्यापारी संकुलातील पार्कींगचा प्रश्न न सुटल्याने महापालिकेत अनोखे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात विविध व्यापारी संकुलातील पार्कींगच्या (बेसमेंट) जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामाला विरोध दर्शवण्यासाठी सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता गेल्या २ वर्षापूर्वी ७ डिसेंबर २०२० रोजी मनपा आयुक्त कार्यालयाच्या दालनात एक दिवसीय उपोषण देखील केले होते. त्यावेळी आयुक्तांनी पार्किंगची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू दोन वर्ष होवून देखील आश्वासन पुर्ण न झाल्याने दीपककुमार गुप्ता यांनी गांधीगिरी करत बुधवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिका आवारात केक कापून आश्वासनाची आठवण करून देत महापालिकेचे लक्ष वेधले.

जळगाव शहरातील विविध व्यापरी संकुलातील पार्किंगच्या जागेत अनधिकृतपणे बांधकामाला विरोध दर्शविण्यासाठी दीपक कुमार गुप्ता यांनी दोन वर्षापुर्वी ७ डिसेंबर २०२० रोजी जळगाव महापालिका आयुक्तांच्या दालानासमोर एक दिवसीय उपोषण मांडले होते. या उपोषणासाठी 4 x 4 आकारमान असलेल्या जागेची शासकीय फी भरण्याची तयारी देखील दर्शवली होती. या सर्व द्रविडी खटाटोपानंतर सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना मनपा आयुक्तांकडून आश्वासन देण्यात आले होते. लवकरात लवकर जळगाव शहरातील व्यापारी संकुलातील बेसमेंटच्या जागी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ते आश्वासन होते. कॅलेंडरच्या तारखा बदलत बदलत दोन वर्षाचा कालावधी उलटला, मात्र बेसमेंटचा विषय काही मार्गी लागला नाही. मात्र गुप्ताजी आश्वासन काही विसरले नाही. त्यांनी मनपा प्रशासनाला आपल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी आज मंगळवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता केक खाओ आंदोलन करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले.

Protected Content