वृत्तपत्रे व पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी ‘व्हाईस ऑफ मिडिया’चे धरणे आंदोलन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथे व्हाईस ऑफ मिडिया शाखा अमळनेरच्या वतीने वृत्तपत्रे व पत्रकारांच्या न्याय व विविध मागण्यांसाठी अमळनेर तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

 

माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते. मात्र पत्रकारांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. आम्ही  ‘व्हाईस आफ मीडिया’ च्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्यांकडे लक्ष वेधत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.

 

पत्रकारांच्या अश्या आहेत मागण्या

१) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. २) पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. ३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा.  ४) पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. ५) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. ६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.

 

 

तरी आपण आमच्या मागण्या आपल्या मार्फत शासन स्तरावर पाठवाव्यात आणि आम्हाला तीव्र आंदोलन करण्याचे पाऊल उचलावे लागू नये अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पदभार स्वीकारलेले नूतन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी  पत्रकारांचा सन्मान राखत आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्विकारले, शासन स्तरावर तात्काळ निवेदन पाठविले जाईल असे सांगितले.

 

आंदोलनासाठी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला,यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा.सुभाष पाटील,अमळनेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना सर्व पदाधिकारी व सदस्य, तलाठी संघटना, तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष महेंद्र बोरसे, सरपंच संघटना पदाधिकारी व सदस्य तसेच महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ही पाठिंबा दिला.

 

या निवेदनावर ‘ व्हाईस ऑफ मीडिया’ चे तालुकाध्यक्ष अजय भामरे , उपाध्यक्ष राहुल पाटील, सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष  रवींद्र मोरे , सदस्य ईश्वर महाजन, विनोद कदम, रवींद्र बोरसे, रमण भदाणे तसेच लोकमत पत्रकार संजय पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत काटे, उपाध्यक्ष प्रा ‌.विजय गाढे,  गौतम बि-हाडे, जयंत वानखेडे, समाधान मैराळे, हितेश बडगुजर, योगेश पाने, कमलेश वानखेडे, प्रवीण बैसाणे, राहुल बैसाणे, मिलिंद निकम, सुकदेव ठाकूर, नूर खान पठाण, सोपान भवरे, प्रा.हिरालाल पाटील, गुरुनामल बठेजा आदी पत्रकार बांधवांच्या सह्या आहेत

Protected Content