जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वुमेन्स ॲन्ड चाईल्ड केअर प्लस या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल रविवारी २६ मार्चला घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष म्हणून पुनश्च शांता वाणी यांची एकमताने निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी बबिता पंडीत, सचिव- छाया पाटील, सहसचिव – निवेदिता ताठे, कोषाध्यक्ष- संगिता यादव प्रसिध्दी प्रमुख शिल्पा रावेरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य याप्रमाणे – हेमलता कुलकर्णी, अनिता बडगुजर, रुपाली पवार, शालिनी पाटील, पुजा पंडीत, वंदना पांडे, अर्चना पाटे, ज्योती दातेराव, मीना कुलकर्णी, गायत्री महाजन,स्मिता वेद, आणि सायली चंद्रात्रे यांची निवड करण्यात आली.
प्रारंभी शांता वाणी यांनी संस्थेने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला. यावेळी पुढील वर्षात कष्टकरी महिला आणि त्यांचे पाल्य यांच्यासाठी भरघोस कार्यक्रम घेण्याचे ठरले. वार्षिक सभासद फी १२० रु. घेण्याचे तसेच जे.डीसी.सी.बॅंकेत खाते उघडण्याचे, नविन सभासद करण्याचे सर्वानुमते ठरले. पुढील कार्यक्रम एस.एम.आय टी.कॉलेज समोर घेण्याचे ठरले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.