विद्यापीठ आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या सामंजस्य करार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्यात १० मे रोजी सामंजस्य करार करण्यात आला.

 

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विनोद पाटील आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक धनंजय कुलकर्णी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, नवउपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, अधिष्ठात डॉ. अनिल डोंगरे, प्लेसमेंट समन्वयक प्रा. रमेश सरदार उपस्थित होते. या करारामुळे विद्यापीठ प्रशाळा आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन तसेच विविध उद्योगामध्ये नोकरी क्षेत्रात कौशल्यपूर्ण रोजगार सुरक्षित करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात प्रमुख शहरामध्ये ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content