वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्षपदी संगिता साळुंखे

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता संजय साळुंखे यांची वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

तालुका कार्यकारिणी जाहीर
यासह उपाध्यक्षपदी संजीवनी छत्रपती रत्नपारखी, रत्ना प्रमोद सोनवणे, माधुरी मनोज चौधरी, अनिता प्रवीण सपकाळे, जनाबाई आनंदा पाटील, महासचिवपदी मनिषा फकीरा मराठी, कोषाध्यक्षपदी सुलोचना पुरुषोत्तम खोब्रागडे, सचिवपदी लता सुभान सपकाळे, संपर्कप्रमुखपदी वत्सला तुकाराम चौधरी, संघटकपदी संगिता बेडसे, सह संघटकपदी मंगला योगेश राखुंडे तसेच सदस्य म्हणून इर्शाद लोकमान तडवी, प्रमिला प्रकाश तामस्वरे, ज्योती अवनीश सावळे रूपाली गणेश रावत, पोर्णिमा राहुल सोनवणे, कांता भिमराव कदम, वर्षा भारत शिरसाट, रत्ना सिद्धार्थ खरे यांची निवड करण्यात आली.

संगिता साळुंखे व त्यांच्या टीमने अनेक वर्षापासून पूर्ण निष्ठेने तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे व संघटनेचे ध्येयधोरणे पोहोचवून सामाजिक कार्य केले आहे. याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी संगिता साळुंखे यांची जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड केली आहे. यापुढे वरिष्ठांच्या आदेशाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करेल तसेच गावागावात नव्याने वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष व शाखा स्थापन करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन संगिता साळुंखे यांनी निवडीबद्दल बोलतांना दिले. संत गाडगेबाबा नगर, पाचोरा येथील त्यांच्या निवासस्थानी जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल बागुल, पाचोरा तालुका महासचिव दिपक परदेशी व कार्यकर्ते यांनी भेट देऊन संगिता साळुंखे व संजीवनी छत्रपती रत्नपारखे यांचे अभिनंदन केले यांच्या निवडीबद्दल मित्र परिवार, पदाधिकाऱ्यांसह सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले आहे.

Protected Content