लाचेचा फास : महावितरणचा तंत्रज्ञ व अभियंता जाळ्यात !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वीज मिटर बदलण्यासाठी लाचेची मागणी करणारा महावितरणचा तंत्रज्ञ आणि अभियंता यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचून अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई करून महावितरणच्या दोन कर्मचार्‍यांना अटक केली. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तकारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असुन त्यांच्या अंमळनेर येथील स्वत:च्या मालकीच्या घरात घरगुती वापराचे विज कनेक्शन आहे. हे मिटर सुमारे पाच महीन्यांपासुन बंद पडले असल्याने तकारदार यांना दरमहा सरासरी रकमेची बिल आकारणी होत होती. ते या बिलाची तकारदार नियीमत भरणा करीत होते.सुमारे १० दिवसांपुर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख, म.रा.वि
वि.क मर्या.अमळनेर शहरी विभाग कक्ष-१ हे तकारदार यांच्या राहते घरी येवुन विज मिटरची पहाणी करुन गेले होते. त्यानंतर याच कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील हे तक्रारदाराच्या घरी गेले होते. याप्रसंगी त्यांनी वीज मिटर बदलण्यासाठी दहा हजार रूपये लागतील अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे धमकावले होते.

या अनुषंगाने तक्रारदारांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रत्यक्ष येवुन लेखी तक्रार दिली होती. या अनुषंगाने आज पडताळणी केली असता वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील यांनी स्वत:सह कनिष्ठ अभियंता देशमुख यांच्या करीता पाच हजार रूपयांची मागणी केली. या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने सापळा रचून वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील यांनी तकारदार यांच्या कडुन पंचा समक्ष पाच हजार रूपयांची लाच घेतांना अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच पथकातील राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रविण पाटील, मकरंद पाटील, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल यांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content