रेडिओ क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नंदकुमार बेंडाळे यांना पुरस्कार

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज ।  रेडिओ क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल   खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांना व्हॉईस ऑफ मिडियाचा पत्र महर्षी पुरस्कार देण्यात आला.

 

हा पुरस्कार केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील व प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी स्विकारला.

 

यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मिडिया रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इरफान सय्यद आणि स्वागताध्यक्ष हरी कुलकर्णी,  रेडिओ विश्वास चे सर्व सहकारी , कर्मचारी आणि व्हॉईस ऑफ मिडिया रेडिओ विंगचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते.

Protected Content